आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Actress Lalan Sarang, Latest News In Divya Marathi

‘सखाराम बाइंडर’च्या प्रसिद्धीबरोबरच मानसिक त्रासही- लालन सारंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘सखाराम बाइंडर’ या नाटकाने प्रसिद्धीबरोबरच मानसिक त्रासही दिला. या नाटकामुळे कोर्टाची पायरी चढावी लागली. पण आम्ही ते नाटक झेलले. आज हे सर्व सांगताना मजा वाटते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांनी व्यक्त केली. नगर जिल्हा वाचनालयातर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेत झालेल्या प्रगट मुलाखतीत त्या बोलत होत्या. सारंग यांची प्रकट मुलाखत शिल्पा रसाळ यांनी घेतली. आमदार अनिल राठोड, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, उपाध्यक्ष प्राणज्योती कुलकर्णी, कार्यवाह विक्रम राठोड, सहकार्यवाह उदय काळे, अजित रेखी आदी यावेळी उपस्थित होते. मुलाखतीत सारंग यांनी ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा, रथचक्रमधील ती, सूर्यास्तमधील जनाई या भूमिकांच्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला.
सारंग म्हणाल्या, रंगभूमीवर साकारत असलेल्या विविध व्यक्तिरेखांचा परिणाम आपल्या वैयक्तिक जीवनावरही होतो. त्या व्यक्तिरेखेचा विचार सतत आपल्या मनात असतो. नाटक संपल्यानंतर आपण एकदम यातून बाहेर येऊ शकत नाही. ‘सखाराम बार्इंडर’मधील चंपा या भूमिकेबाबत त्या म्हणाल्या, ‘सखाराम बार्इंडर’साठी विजय तेंडुलकर यांचे लेखन व कमलाकर सारंग यांचे दिग्दर्शन होते. प्रारंभी मी चंपाची भूमिका करावी, यास तेंडुलकरांचा विरोध होता. तेंडुलकरांनी माझी नाटके यापूर्वी पाहिली होती. या नाटकाने जशी प्रसिद्धी दिली. तसाच प्रचंड मानसिक त्रासही दिला.
नाटकामुळे कोर्टाची पायरी चढावी लागली. पण ते नाटक आम्ही झेलले. त्यावेळी मोर्चे, आंदोलने, टीका, कोर्ट केसेस, हे सर्व ‘सखाराम’मुळेच घडले. जंगली कबूतर, बेबी, बार्इंडर, धंदेवाईक या नाटकांमधील भूमिका प्रेक्षकांना बोल्ड वाटल्या. पण प्रत्येक व्यक्तिरेखेची वेगळी गरज होती. हे सर्व ओघाने घडत गेले. त्यानंतर या सर्वांना छेद देणारी ‘सूर्यास्त’मधील जनाईची भूमिका केली.

निळूभाऊंची भीती वाटली नाही
निळू फुले यांच्याबरोबर मी चार नाटकांमध्ये काम केले. ते माणूस म्हणून खूप चांगले होते. मला निळूभाऊंची कधीच भीती वाटली नाही. त्यांनीही कधी तसे दाखवले नाही. आज आपण पुण्यात स्थायिक झालो आहोत. चंपाच्या त्यावेळच्या आठवणी आल्या की खूप गंमत वाटते.’’
लालन सारंग, ज्येष्ठ अभिनेत्री.