आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या ऑनलाइन रिझर्व्हेशनमध्ये सवलत मिळावी, या मागणीसाठी इंडिया अगेन्स्ट टेररिझम संघटनेने लढा उभारला आहे. यात भारतीय जनता पक्षही सहभागी झाला असून याप्रकरणी पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पूनम महाजन यांनी महामंडळाला पत्र पाठवले आहे, अशी माहिती संघटनेचे मनोज कोकाटे यांनी दिली.
कोकाटे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन रिझर्व्हेशनमध्ये सवलत मिळावी, अशी मागणी इंडिया अगेन्स्ट टेररिझमने राज्य परिवहन महामंडळाकडे केली आहे. संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच महाजन यांच्याशी याबाबत चर्चा केली. या मागणीचा त्या स्वत: पाठपुरावा करणार असून तसे पत्र महामंडळाच्या अध्यक्षांना पाठवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. संघटनेतर्फे दहशतवाद व अन्यायाविरोधात जनजागृती करून प्रश्न सोडवण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी त्यांच्या समस्या मांडाव्यात, त्या सोडवण्यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आम्ही लढा देणार आहोत. लवकरात लवकर ज्येष्ठांना सवलत मिळवण्याचा संघटनेचा प्रयत्न असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.