आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदासाठी कार्यकर्त्यांची मोठ्या पुढाऱ्यांकडे पहावे : जोशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आयुष्यात अनेक पदे मिळत गेली तरी बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले पद माझ्यासाठी खूप माेठे होते. ज्या कार्यकर्त्याला राजकारणात मोठे पद हवे असते, त्यांनी मोठ्या पुढाऱ्यांकडे पाहत रहावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले. सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाकडून जोशी यांना गुरुवारी सायंकाळी ज्ञानविज्ञान पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ते बोलत होते. शिवसेना उपनेते अनिल राठोड, मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे, सुनिता पाटील, सुमन वारे, अशोक सरनाईक, अशोक नवले, आदिनाथ जोशी, पद्माकर देशपांडे, शरद देशमुख, सुरेश कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी, शरद कुलकर्णी, सर्वोत्तम क्षीरसागर, ज्योती केसकर, बलभीम पांडव आदी यावेळी उपस्थित होते. जोशी म्हणाले, स्वर्गीय ठाकरे यांनी त्यावेळी दिलेेले पद माझ्यासाठी खूप आहे. शिवेसना कार्यकर्त्यांवर माझे प्रेम असून कार्यकर्त्यांचेही माझ्यावर प्रेम होते. राजकारणात मोठे पद हवे असल्यास, कार्यकर्त्यांनी पक्षातील मोठ्या पुढाऱ्याकडे पाहत राहावे. स्वर्गीय ठाकरे यांच्या आशिर्वादानेच लोकसभा अध्यक्षपदापर्यंत मजल मारता आली. माणसाचे जीवन हे सापसिडीसारखे आहे. सापाच्या तोंडी सापडला की, खाली यावे लागते परत धीराने वर चढावे लागते. सकारात्मक विचार ठेवून जीवनात आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन विणा दिघे यांनी, तर आभार अशोक नवले यांनी मानले.
ज्येष्ठ नागरिक मंच सावेडी यांच्यावतीने ज्ञानविज्ञान पुरस्कार माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना प्रदान करताना माजी आमदार अनिल राठोड, चंद्रशेखर करवंदे, बलभीम पांडव, अशोक सरनाईक आदी.