आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोरया चिंचोरेतील कामे पाहून भारावले ज्येष्ठ नागरिक, नगरच्या ज्येष्ठ नागरिकांची नेवासे तालुक्यात वर्षा सहल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर व सावेडी परिसरातील सुमारे १३५ ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच नेवासे तालुक्यातील मोरया चिंचोरे गावाला भेट दिली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या या गावातील विकासकामांची पाहणी करून प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष चंद्रशेखर करवंदे, कार्यवाह अशोक सरनाईक यांनी तीन महिन्यांपूर्वी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांची भेट घेऊन सामाजिक कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार रविवारी ज्येष्ठ नागरिकांनी मोरया चिंचोरेसह देवगड, शनिशिंगणापूर, रेणुकामातेचे काच मंदिर, मुळा कारखाना परिसर, कौतुकी नदी सुशोभीकरण व मुळा एज्युकेशन संस्थेला भेट दिली.
मोरया चिंचोरे येथील जलसंधारणाची कामे, नाना-नानी पार्क, मोफत असलेले यशवंत रुग्णालय, वृक्षारोपण, वन्यप्राण्यांसाठीचा पाणवठा अशा विविध ठिकाणांना त्यांनी भेटी दलि्या. मोरया चिंचोरे येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी सर्वांचे स्वागत केले. या प्रतिष्ठानची स्थापना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झाल्याचे त्यांनी सांगितले. हिवरेबाजारचे सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांचे सहकार्य वेळोवेळी मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
करवंदे म्हणाले, आम्ही दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणांना भेटी देतो. प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या सहलीचा आनंद अवर्णनीय आहे.

ज्येष्ठांमध्ये उत्साह सामाजिक उपक्रमांत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे मंचाचे कार्यवाह अशोक सरनाईक यांनी सांगितले. अशोक नवले, ज्योती केसकर यांनी गडाख यांचा सत्कार केला. ९६ वर्षाचे अप्पासाहेब बालटे यांनी मोरया चिंचोरे गावात पायी चालून आपल्यातील उत्साहाचे दर्शन घडवले.