आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Educator Dr. Sharad Kolte,Latest News In Divya Marathi

उच्च् शिक्षणासह युवकांकडे कौशल्यही हवे : डॉ. कोलते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- युवकांनी मोठ्या नोक-यांची अपेक्षा न ठेवता छोट्या नोकरीपासून सुरुवात करणे आवश्यक आहे. कष्ट, प्रामाणिकपणा, सातत्य व जिद्द यांची सांगड घातली, तर यश तुमच्याकडे धावत येईल. युवकांनी केवळ उच्च शिक्षण घेऊन चालणार नाही, तर त्या जोडीला कौशल्य हस्तगत करणेही महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते यांनी केले. युवाशक्ती व अभिनव युवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने पेमराज सारडा महाविद्यालयात आयोजित रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार दिलीप गांधी, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष मधुसूदन मुळे, सचिव सुनील रामदासी, उद्योजक अनुराग धूत, नगरसेवक श्रीपाद छिंदम, शरद दळवी, दीपाली बारस्कर आदी उपस्थित होते.
डॉ. कोलते म्हणाले, रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून ज्यांना नोकरी पाहिजे, तसेच ज्यांच्याकडे नोक-या उपलब्ध आहेत, अशांची योग्य सांगड घालण्यात आली आहे. पात्र उमेदवार मिळत नसल्याने अनेक कंपन्यांमध्ये जागा रिकाम्या आहेत. त्यासाठी युवकांकडे आता नुसतेच उच्च शिक्षण असून चालणार नाही, तर जोडीला कौशल्य असणेही गरजेचे आहे. खासदार गांधी म्हणाले, स्वत:च्या पायावर उभे राहण्याची प्रत्येक युवकाची अपेक्षा असते. आपला देश शेतीप्रधान असला, तरी त्यास उद्योगधंद्यांची जोड असणे गरजेचे आहे. नगरमधील उद्योगांना चालना मिळावी, यासाठी नगरचा समावेश गोल्डन कॉरिडोअरमध्ये करण्यात आला आहे. लवकरच तशी घोषणा होईल. गोल्डन कॉरिडोअरमुळे नगरमध्ये एक जरी मोठा उद्योग आला, तर हजारो युवकांना नोक-या उपलब्ध होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम वडागले व पीयूष जग्गी यांनी केले, तर नितीन शेलार यांनी आभार मानले.