आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ पत्रकार नाना मोने यांचे नगरमध्ये निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जुन्या पिढीतील ज्येष्ठ पत्रकार व समाजवादी चळवळीतील अभ्यासू व्यक्तिमत्त्व यशवंत पुरूषोत्तम मोने (नाना) यांचे विळद येथील विखे हॉस्पिटलमध्ये मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर देहदान करण्यात आले.

मूळचे परभणी येथील नाना मोने यांनी संयुक्त महाराष्ट्र, तसेच समाजवादी चळवळीत हिरीरीने भाग घेतला. नवाकाळ, मराठा व गावकरी (मुंबई) या वृत्तपत्रात त्यांनी पत्रकारिता केली. अ. भा. मराठी पत्रकार परिषद, मुंबई पत्रकार संघ, तसेच विधिमंडळ वार्ताहर संघाशी त्यांचा निकटचा संबंध होता. एसटी महामंडळ व सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे ते संचालक होते. भारतीय कृषक मैत्री संघातर्फे त्यांनी रशिया व युरोपचा दौरा केला होता.

माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्याशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. विखे पाटील हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत होते. मंगळवारी सकाळी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. यावेळी त्यांच्या पत्नी बरोबर होत्या. नानांच्या इच्छेनुसार त्यांचा देह विखे हॉस्पिटलला दान करण्यात आला.