आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Leader Yashwantrao Gadakh Speaks On Nagar District Divide

जिल्ह्याचे विभाजन होणे संयुक्तिकच, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भौगोलिकदृष्ट्या मोठा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणे हे संयुक्तिक आहे, असे मत ज्येष्ठ नेते व माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी रविवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

जिल्हा विभाजनाबाबत बोलावलेल्या बैठकीची मला माहिती नाही, असे सांगून गडाख म्हणाले, जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव सर्वप्रथम मीच मांडला होता. मागील शंभर वर्षांत शासनाकडून जिल्हा विकासासाठी मिळालेल्या निधीची माहिती गोळा करून अभ्यास केला असता आलेल्या निधीपैकी सत्तर टक्के निधी सत्तेत अनेक वर्षे जिल्ह्याच्या उत्तरेचेच नेते मंत्री असल्याने तिकडेच खर्च झाल्याचे लक्षात आले. केवळ 30 ते 35 टक्के निधी दक्षिणेत वापरला जात होता. हा विकासाचा असमतोल होता. तो दूर होणे गरजेचे होते.

तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार सोनई येथे आले होते, तेव्हा ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली होती. जिल्ह्यातील सर्व नेत्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी विभाजन मान्यही केले होते. मधल्या काळात हा मुद्दा मागे पडला. नव्याने निर्माण होणार्‍या जिल्ह्याचे ठिकाण संगमनेर की र्शीरामपूर यावरून वाद होत असल्याने जिल्हा विभाजन वादात आहे, असेही गडाख म्हणाले.