आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Social Worker Anna Hazare News In Marathi

राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या नावे तरुणाची फोनवरुन शिवीगाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर नारायणपूर (जि. पुणे) येथून नीलेश पोतनीस असे नाव सांगून अण्णांसह मंत्र्यांच्या नावाने शिवीगाळ करून गेले महिनाभर धमकी दिली जाते. मात्र, याबाबत पोलिसात तक्रार दिलेली नाही.
‘पुणे येथील सारसबागेजवळील माझी जमीन काहीजणांनी हडप केली. यास पोलिस, हजारे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, आर. आर. पाटील, प्रणिती शिंदे हे जबाबदार आहेत,’ असे सांगत हा व्यक्ती फोनवर शिवीगाळ करतो. पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही तो देतो, असे दत्ता आवारी यांनी सांगितले.