आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागील सहा महिन्यांत १३ लाख प्रवाशांना सेवा, ४० टक्के प्रमाण विद्यार्थ्‍यांचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या सहा महिन्यांत शहर बससेवेचा (एएमटी) तब्बल १३ लाख ५० हजार ४५९ प्रवाशांना लाभ झाला. त्यात ४० टक्के विद्यार्थ्यांचा समावेश आहे. रिक्षाचालकांच्या मनमानीला
कंटाळलेल्या प्रवाशांनी आता एएमटीला आपलेसे केले आहे. एएमटीच्या ठेकेदार संस्थेनेही आपल्या प्रवाशांना एक लाख रुपयांचे विमाकवच दिले आहे. आतापर्यंत दोन प्रवाशांना त्याचा
लाभही मिळाला. विद्यार्थ्यांना विशेष सवलत मिळत असल्याने एएमटीच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीला चाप बसला आहे.

नगर शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. केडगाव, नागापूर, बोल्हेगाव, भिंगार, निंबळक, एमआयडीसी अादी भागातील नागरिकांना शहराशी जोडण्याचे काम सध्या एएमटी
करत आहे. सुरुवातीला प्रसन्ना पर्पल या संस्थेमार्फत ही सेवा सुरू होती. परंतु या संस्थेने महापालिका प्रवाशांना वेठीस धरत सेवा बंद केली. त्यानंतर माजी महापौर विद्यमान आमदार
संग्राम जगताप यांच्या प्रयत्नाने बससेवेचा ठेका यशवंत आॅटो या स्थानिक संस्थेकडे देण्यात आला. या संस्थेने सुरुवातीला दहा बस सुरू केल्या. परंतु प्रवाशांची संख्या पाहता ही
बससेवा अपुरी पडत होती. त्यामुळे ठेकेदार संस्थेने करारनाम्याच्या अटी-शर्तीनुसार मागील आठवड्यात आणखी ११ बसेस सुरू केल्या. त्यामुळे बसच्या फेऱ्या, तर वाढल्याच शिवाय
रिक्षाने प्रवास करणारे हजारो प्रवासी बससेवेशी जोडले गेले आहेत. त्यात विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक एमआयडीसीतील कामगारांची संख्या अधिक आहे. सहा महिन्यांत १३ लाख ५० हजार
प्रवाशांना एएमटी सेवेचा लाभ झाला. या प्रवाशांना ठेकेदार संस्थेने एक लाख रुपयांचे विमाकवच दिले आहे. प्रत्येक प्रवाशाचा एक लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी त्यांना हव्या त्या वेळेत बससेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. शिवाय विद्यार्थ्यांना ३० दिवसांचा पास वीस दिवसांच्या खर्चात मिळत आहे.
मागील काही महिन्यांपासून शहरातील अनधिकृत रिक्षाचालकांनी प्रवाशांची अक्षरश: अार्थिक लूट केली. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे महिन्याचे अार्थिक नियोजन कोलमडले होते.
विशेष करून विद्यार्थ्यांना शाळा- महाविद्यालयांच्या वेळात पोहोचण्यासाठी रिक्षाचालकांची विनवणी करावी लागत होती. रिक्षाचालक मात्र त्यांचा गैरफायदा घ्यायचे. िवद्यार्थिनींना
रिक्षात दाटीवाटीने बसावे लागायचे, त्यात त्यांना छेडछाडीच्या प्रकरणांना देखील सामोरे जावे लागायचे. आता मात्र बसची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय दूर झाली
आहे. जास्तीत जास्त चांगली सुरक्षित सेवा देण्याचा ठेकेदार संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा पाेलिसांनी रिक्षाचालकांच्या अरेरावीला लगाम घातला पाहिजे, अशी
ठेकेदार संस्थेची मागणी आहे. भविष्यात बसची संख्या आणखी वाढवण्याचा मानस असल्याचे संस्थेचे संचालक धनंजय गाडे यांनी स्पष्ट केले आहे.

११ मार्गावर सेवा
२१ बस शहरात सुरू

दोघांना मिळाला विमा
दीड महिन्यापूर्वी एएमटीमधून खाली उतरताना दोन प्रवासी पडले होते. त्यांना गंभीर दुखापत झाली होती. ठेकेदार संस्थेने या प्रवाशांना तत्काळ विमा उपलब्ध करून दिला. त्यांच्या
उपचाराचा सर्व खर्च विम्याच्या रकमेतून करण्यात आला. ठेकेदार संस्थेकडून सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत असल्याने एएमटीचे प्रवासी दिवसेंदिवस वाढत आहेत.

वाहतूक कोंडीची समस्या
बससेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. बसची संख्या वाढल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाली. शहरातील वाहतूक कोंडी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बसच्या वेळा पाळणे कठीण होत
आहे. जिल्हा प्रशासन, मनपा पोलिसांनी वाहतूक काेंडीवर नियंत्रण ठेवून बसथांब्यांवरील रिक्षाचालकांवर कारवाई केली, तर अधिक चांगली सेवा देता येईल.'' धनंजय गाडे,
संचालक,यशवंत ऑटो अभिकर्ता.

प्रवासी भाड्यात वाढ नाही
केडगाव,निर्मलनगर, निंबळक, धरमपुरी, भिंगार, व्हीआरडीई, नागापूर, बोल्हेगाव आदी भागात बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. भिंगारमधून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत
आहे. विद्यार्थ्यांसह कामगारांना एएमटीचा मोठा दिलासा मिळाला आहे. ठेकेदार संस्थेने प्रवासी भाड्यात कोणतीही वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खर्चात मोठी बचत
होत आहे.