आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शहराच्‍या सेतू’त साधला जातो ‘हेतू’!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाजवळील सेतू कार्यालयात नवीन शिधापत्रिकेसाठी लागणारा फॉर्म पाच रुपयांना विकला जातो. मात्र, त्याची कुठलीही अधिकृत पावती नागरिकांना दिली जात नाही. त्यामुळे सेतू कार्यालयात ‘आर्थिक हेतू’ साधला जातो, अशी नागरिकांची तक्रार आहे.
सर्वसामान्य नागरिकांचा वेळ व पैसा वाचावा, या हेतूने जिल्हा प्रशासनाने शहरासह ग्रामीण भागात सेतू कार्यालये सुरू केली. तथापि, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील सेतू कार्यालयात मात्र वेगळाच कारभार सुरू आहे. नवीन शिधापत्रिकेसाठी लागणार्‍या फॉर्मसाठी या सेतू कार्यालयात नागरिकांकडून पाच रुपये घेतले जातात. मात्र, त्याची कुठलीही पावती दिली जात नाही. याबाबत ‘दिव्य मराठी’ने बुधवारी सेतू कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता फॉर्म मिळणार नाही, असे तेथील कर्मचार्‍यांकडून नागरिकांना सांगण्यात येत होते.
शहर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालयाजवळ हे सेतू कार्यालय आहे. नवीन शिधापत्रिका, तसेच शिधापत्रिकेतील नावे कमी करण्यासाठी लागणारे फॉर्म तेथे मिळतात. या फॉर्मसाठी किती शुल्क लागते याबाबतची माहिती नागरिकांना नसते. कार्यालयातील कर्मचारी एका फॉर्मसाठी पाच रुपये घेतात. गॅस अनुदानासाठी विभक्त शिधापत्रिका लागत असल्यामुळे दररोज मोठय़ा प्रमाणात शिधापत्रिकाधारक या सेतू कार्यालयात येतात. राजीव गांधी जीवनदायी योजनेसाठीही शिधापत्रिका लागते. या योजनेचे लाभार्थी मोठय़ा संख्येने शिधापत्रिकेचा फॉर्म घेण्यासाठी येतात. सेतूत आल्यानंतर खिडकी क्रमांक 3 वर फॉर्मसाठी पाच रुपये शुल्क घेतले जाते. मात्र, फॉर्मवर कुठलेही शुल्क लिहिलेले नाही. तसेच नागरिकांना फॉर्म दिल्यानंतर अधिकृत पावतीही दिली जात नाही. या कार्यालयातून दररोज 800 फॉर्म व महिन्याकाठी सुमारे अडीच हजार फॉर्मची विक्री होत असावी. त्यातून महिन्याकाठी सेतू कार्यालयाला 1 लाख 20 हजार रुपये मिळतात.