आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेतूतील गोंधळाचा विद्यार्थ्यांना मनस्ताप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - जिल्हाधिका-यांची टेंडरची मुदत संपल्याने अकोल्यातील काही सेतू कार्यालयांचे काम थांबले आहे. सध्या प्रवेश सुरू असल्याने सेतू कार्यालयात गर्दी वाढली आहे. दाखले तातडीने मिळवण्यासाठी विद्यार्थी - पालकांची घाई सेतू चालकांसाठी आर्थिक कमाईसाठी पर्वणी बनली आहे.
ज्या सेतू चालकांनी परवाना पुन्हा नूतनीकरण केलेला नाही, त्यांचे कामकाज महसूल खात्याने थांबवले आहे. मात्र, तीन महिन्यांपासून काम थांबवलेल्या या सेतू केंद्राकडे दाखले प्रकरणांचा व दाखल्यांचा निपटारा झाला आहे किंवा नाही याकडे डोळेझाक केलेल्या महसूल अधिका-यांना तक्रारदार पालक विद्यार्थ्यांनी जेव्हा धारेवर धरले तेव्हा तहसीलदार चंद्रशेखर देशमुख यांनी निवासी नायब तहसीलदार रूपेश सुराणा यांना परवाना मुदत संपल्याने बंद पडलेल्या एका सेतू केंद्राची चौकशी करायला सांगितली.
या चौकशीत संबंधित सेतू केंद्राकडे स्वत:कडे धूळ खात पडलेले 470 दाखल्यांचे प्रस्ताव व मंजूर होऊन सही झालेले 530 दाखले सापडले. या सर्व कागदपत्रांचा पंचनामा मागील गुरुवारी (26 जून) सुराणा यांनी करून दाखले व प्रस्ताव ताब्यात घेतले. तीन महिन्यांपासून प्रलंबित व मंजूर दाखले संबंधितांना न मिळाल्याने अनेकांना नवीन प्रस्ताव दाखल करण्यासाठी आर्थिक झळ सोसून मनस्तापही सहन करावा लागला आहे.
या प्रकाराबाबत विद्यार्थी व पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
मंजूर असलेले दाखले
०रहिवास प्रमाणपत्र 80
०उत्पन्नाचे दाखले 74
०राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 32
०डोंगरी प्रमाणपत्र 74
०महिला आरक्षण 04
०नवीन रेशनकार्ड 31
०नॉन क्रिमिलेअर 36
०अनुसूचित जाती जमाती 24
०अनुसूचित जमाती 08
०संजय गांधी योजना 10
०इतर मागासवर्गीय 35
०मराठा जा. प्र. 16
०अनुसूचित जाती जमाती 59
०आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग 10
दाखल प्रस्ताव
०अनुसूचित जमाती 345
०जन्म-मृत्यू दाखले 27
०शेतकरी दाखले 06
०राष्ट्रीयत्व दाखले 10
०नवीन रेशनकार्ड 10
०दुबार रेशनकार्ड 02
०रहिवास दाखला 36
०कुणबी दाखला 20
०नॉन क्रिमिलेअर 01
०महिला आरक्षण 02
०डोंगरी प्रमाणपत्र 11
०सेतू केंद्रात धूळ खात पडलेले 470 दाखल्यांचे प्रस्ताव व मंजूर होऊन सही झालेले 530 दाखले सापडले.