आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगमनेर पोलिसांकडून जीवदान मिळालेली सात वासरे दगावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी कारवाई दरम्यान पकडलेल्या जनावरांची माहिती घेतली. छाया: विवेक भिडे.पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी कारवाई दरम्यान पकडलेल्या जनावरांची माहिती घेतली. छाया: विवेक भिडे)
संगमनेर-रविवारी शहरातील कत्तलखान्यांवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी जीवदान दिलेल्या २१२ जनावरांपैकी सात वासरांचा मृत्यू झाला. बरीच वासरे मृत्यूशी झुंज देत आहेत. फरार झालेल्या बारापैकी सातजणांना पोलिसांनी अटक केली असून अटकेतील आरोपींची संख्या ११ झाली आहे. अजून पाचजण फरार आहेत.

शहर पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कत्तलखान्यावर धडक कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा तपास करणा-या सहायक निरीक्षक शिवाजी पाळदे यांनी सातजणांना अटक करण्यात दुस-याच दिवशी यश मिळवले. वसीम अब्दुल कुरेशी, लाला रज्जाक कुरेशी, कदीर बुढण कुरेशी, समीर हसन कुरेशी, जहिर इर्शाद कुरेशी, तौसिफ आरिफ कुरेशी आणि हाजी गुलाम कुरेशी अशी या आरोपींची नावे आहेत. अटक केलेल्या नावेद जावेद कुरेशी, मोहमंद नासीर जम्मुल शेख, अलीम जलील कुरेशी शफीक मोहमद कुरेशी यांना चार दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली. दरम्यान, मालेगावच्या एका गोपालन संस्थेने जीवदयाला पन्नास हजारांची मदत दिली.निरीक्षक चव्हाण यांनी जीवदया संस्थेस भेट दिली.

जनावरांवर उपचार सुरू
कारवाईतपकडलेल्या जनावरांवर उपचार सुरू आहे. वासरांना दूध पाजण्यात येत आहे. मात्र, यातील बहुतांश जनावरे वाचण्याची शक्यता कमी अाहे. या जनावरांना अनेक दिवस उपाशी ठेवले गेल्याने त्यांना आईच्याच दुधाची आवश्यकता आहे, असे राजेश दोशी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...