आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Years' Imprisonment In Case Of Death Of One Of The Nevasa

नेवाश्यातील मृत्यूप्रकरणी एकास सात वर्षे शिक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

र्शीरामपूर-नेवासे शहरातील लक्ष्मी एजन्सी या दुकानात गोळीबार केल्याने शहानवाज नवाबखान पठाण (65) या व्यापार्‍याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून सचिन पांडुरंग घोरतळे (27) यास र्शीरामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. कुलकर्णी यांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील तिघे आरोपी फरार असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते महेश शिवराम मापारी यांच्यासह चौघा आरोपींची निदरेष मुक्तता करण्यात आली.

नेवासे येथे दिवाळी सणाच्या काळात 24 ऑक्टोबर 2011 रोजी सायंकाळी लक्ष्मण जगताप यांच्या मालकीच्या लक्ष्मी एजन्सी या दुकानात सचिन घोरतळे आला. दुकानात त्यावेळी लक्ष्मण जगताप यांचे चिरंजीव कमलेश होते. त्यावेळी त्याने 25 हजार रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून जगताप यांच्या दिशेने गावठी पिस्तुलातून गोळीबार केला. पण जगताप आत पळाल्यामुळे बचावले.

मात्र, टीव्ही पहायला आलेले शेजारच्या दुकानाचे मालक शहानवाज नवाबखान पठाण गोळी लागून जखमी झाले. त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. घटनेनंतर आरोपी सचिन घोरतळे फरार झाला होता. पोलिसांनी तपास करून त्यास जळका फाटा येथे अटक केली. तपासात घोरतळे याला पप्पू गिरे याने पळून जाण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाले. मापारी यांनी राजेंद्र काळे यांच्या वाड्यात बैठक घेतली.

चार जण निदरेष मुक्त

गुन्ह्यातील आरोपी सोन्या ऊर्फ सुनील परदेशी, पवन सोमनाथ नरूला, रवी राजू भालेराव हे तिघे फरार आहेत. महेश मापारी, पप्पू संभाजी गिरे, राजेंद्र कारभारी काळे, संतोष जगन्नाथ पंडुरे या चौघांची न्यायालयाने निदरेष मुक्तता केली. सदोष मनुष्यवधाबद्दल सचिन घोरतळे यास सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारच्या वतीने विधिज्ञ प्रमोद वलटे यांनी काम पाहिले.