आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Years Old Girl On Rape Near Ahmednagar ST Colony

अहमदनगर एसटी कॉलनीजवळ सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर -सर्जेपुरा परिसरातील एसटी कॉलनीच्या आवारातील झाडाझुडपांत सात वर्षांच्या बालिकेवर बलात्कार झाला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना मंगळवारी (7 मे) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फरहान ऊर्फ फरू रशीद शेख (19, कोठला परिसर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 13 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

कोठला परिसरात राहणार्‍या या मुलीला गोड बोलून आरोपीने एसटी कॉलनीजवळ असलेल्या शौचालयाच्या बाजूच्या झाडाझुडपात नेऊन तेथे या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तेथे धाव घेतली. नागरिकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडून तोफखाना पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्कार, लहान मुले व मुली लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम 8 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलिस कोठडी दिली.