आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या सेक्स स्कँडलमधील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- बहुचर्चित नगर सेक्स स्कँडलमधील दुसऱ्या अल्पवयीन मुलीला वाममार्गाला लावून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सर्व दहा आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. खटल्यातील कागदपत्रांवरुन पीडित मुलीची निश्चित ओळख पटू शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निकाल अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दिला. दरम्यान, असा निकाल अनपेक्षित असल्यामुळे उच्च न्यायालयात अपील करण्यात येईल, असे विशेष सरकारी वकील अॅड. विजय सावंत यांनी सांगितले.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींना वाममार्गाला लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते. याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे नोंदवण्यात आले होते. दोन्ही गुन्ह्यांत बहुतांश आरोपी सारखेच होते. यापैकी एका खटल्याचा निकाल २०१० मध्ये लागला असून चेतन भळगट, विलास कराळे, रमेश बरकसे, अब्दुल कुरेशी यांना यापूर्वीच सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अपिलातही न्यायालयाने हीच शिक्षा कायम ठेवली. दरम्यान, भळगट याने पीडित मुलीशी लग्न केल्यामुळे त्याची शिक्षा कमी झाली होती. भळगट कुरेशी सध्या जामिनावर मुक्त आहेत.

दुसऱ्या आरोपींमध्ये मृत शीला बारगळ, रमेश राजाराम बरकसे (सिव्हिल हडको), अब्दुल हकस फकीर महंमद कुरेशी (व्यापारी मोहल्ला, नगर), चेतन पोपट भळगट (फुलारी मळा, सावेडी), सपना रामभाऊ शिंदे (इंिदरानगर, नाशिक), भाग्योदय सुभाष पाटील (मंगळवार पेठ, पुणे), नामदेव मारुती कळसकर (आजरा, कोल्हापूर), राघवेंद्र नागप्पा पुजारी (बालिकाश्रम रस्ता, नगर), कमल दिलीप वराडे (सावेडी), अमित कैलास मदान पंजाबी (नटराज टॉकिजजवळ, नगर), विलास बाळासाहेब कराळे ऊर्फ विलास वाणी (केडगाव, नगर), रामू ऊर्फ राम जगन्नाथ साळवे (जालना) यांचा समावेश होता.

सेक्स स्कँडलच्या दुसऱ्या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण २६, तर आरोपींच्या वतीने साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलीच्या खऱ्या नावाबद्दल असलेला संशय कागदपत्रांवरुन दूर झालेला नाही. त्यामुळे संशयाचा फायदा घेऊन आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. गुन्ह्यातील पुरावे, पीडितेने इतरांनी दिलेली साक्ष पाहता खटल्याचा निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे विशेष सरकारी वकील अॅड. विजय सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

चाइल्डलाइनसाठी निर्णय धक्कादायक
पीडितमुलीने न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहून तिच्यावर झालेले अत्याचार कथन केले होते. वैद्यकीय तपासणीदरम्यान पीडितेने वैद्यकीय अधिकारी पोलिस कर्मचाऱ्यांसमक्ष स्वत:च्या अंगठ्याची निशाणी स्वाक्षरी दिली होती. असे असतानाही पीडितेच्या ओळखीबाबत सबळ पुराव्याभावी आरोपींची निर्दोष सुटका न्यायालयाने केली असून हा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया चाइल्डलाइनचे कार्यकर्ते अनिल गावडे यांनी दिली. पीडित मुलीनेही निकालामुळे धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगून त्यांनी या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...