आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - महिला रूग्णाला फसवून नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार बलभीम परसराम भगत यांनी गुरुवारी पोलिस अधीक्षकांकडे केली. पुराव्यादाखल त्यांनी चित्रीकरण, फोटो व संवादाच्या दोन सीडी देऊन कारवाईची मागणी केली आहे.
भगत यांनी नंतर पत्रकारांनाही याबाबत माहिती दिली. पाच मार्चला अज्ञात व्यक्तीने पाठवलेल्या दोन सीडींमध्ये कांकरिया व एका महिलेची आक्षेपार्ह दृष्ये व मोबाइल संभाषणाचा समावेश आहे. भगत यांच्या नातेवाईक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉ. कांकरिया यांच्याविरूद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. या अनुषंगाने अज्ञात व्यक्तीने आपल्याकडे या सीडी पाठवल्याचे भगत यांचे म्हणणे आहे.
हा संगणकीय बनाव : कांकरिया
डॉ. कांकरिया यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले. भगत यांच्या पत्रकार परिषदेस आमदार शिवाजी कर्डिले यांचे चुलत बंधू उपस्थित होते. यावेळी हॉटेलबाहेर उभी असलेली भाजप पदाधिकाºयाची गाडी हा कोणाचा बनाव आहे, याची पावती आहे. संबंधित महिलेने पोलिसांकडे तक्रार का केली नाही? अधीक्षक व पत्रकारांना दिलेली सीडी हा संगणकीय करामतीचा भाग आहे. मला फसवण्यासाठी रचलेला बनाव आहे. यामागे कोण आहे हे जगजाहीर आहे, असे डॉ. कांकरिया यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.