आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तनवादी शाहिरांची संख्या कमी होतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महाराष्ट्रातील शाहिरी परंपरा साडेतीनशे वर्षे जुनी असली तरी सध्या परिवर्तनवादी शाहिरांची संख्या कमी होत आहे, अशी खंत शाहीर दिनकर साळवे यांनी व्यक्त केली.

र्शमिक युनियन कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कॉम्रेड भास्करराव जाधव स्मृती व्याख्यानमालेत ‘पुरोगामी शाहिरीचे मानकरी’ या विषयावर ते बोलत होते. साळवे म्हणाले, समाज साम्यवादी फुले-आंबेडकरवादी पक्षांशी बांधीलकी असणारे व पक्षाशी बांधीलकी नसूनही परिवर्तनाची कास धरणारे शाहीर महाराष्ट्रात होऊन गेले. मात्र, र्शमातून निर्माण झालेल्या कलेला न्याय दिला गेला नाही.शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ साठे, द. ना. गव्हाणकर यांनी शाहिरी ही कष्टकरी जनतेच्या शब्दातून फुलली आहे. जे सक्तीने उपाशी राहतात त्यांच्याच साहित्यात क्रांतिगीते जन्माला येतात, हे परिवर्तनवादी शाहिरांचे सूत्र आहे. आंबेडकरी चळवळीशी नाळ जोडलेले महाकवी वामनदादांनी आंबेडकरांचे तत्त्वज्ञान त्यांच्याच सोप्या शब्दातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवले आहे. परिवर्तनवादी शाहिरांच्या अनेक गाणे, शाहिरींचा वापर व्यावसायिक चित्रपटसृष्टीमध्ये झाला आहे, असे असतानाही शाहीर उपेक्षित आहेत. कॉम्रेड भास्करराव जाधव यांची महागाईवरील शाहिरी आजही तंतोतंत लागू होते. भास्करराव जाधव यांच्या स्वप्नातील लोकशाही निर्माण करण्याचे काम परिवर्तनवादी चळवळीतील युवक व युवतींनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संदीप सकट, सोमनाथ केंजळे, नीलिमा बंडेलू, कुणाल सिरसाठे, अभय जाधव, सनी लोखंडे, श्याम वैराळ, राहुल गायकवाड, सुनील कात्रे, किशोर म्हस्के, विनय नगरकर आदी यावेळी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रवीण सोनवणे यांनी केले.