आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार प्रेरणादायी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री राम शिंदे अन्य मान्यवरांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले. छाया : उदय जोशी.)
नगर - छत्रपतीशाहू महाराजांनी समाजात असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा नष्ट केल्या. त्यांची भूमिका नेहमी सामाजिक न्यायाची राहिली. त्यांचे चार आजही प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पालकमंत्री राम शिंदे यांनी शुक्रवारी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक आयुक्त समाजकल्याण जिल्हा परिषद समाजकल्याण भाग यांच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय दिनाच्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, समाजकल्याण सभापती मीरा चकोर, महिला बालकल्याण सभापती नंदा वारे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप, माधव वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, प्रा. सुधाकर शेलार, समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले आदी यावेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदर्श घटना देशाला दिली, तर छत्रपती शाहू महाराजांनी त्याकाळी सुरू असलेल्या अनिष्ट रुढी परंपरा नष्ट करण्याचे काम केले. शाहू महाराजांनी नेहमी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन काम केले. समाज व्यवस्थेपासून जे दूर होते, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम शाहू महाराजांनी केले. त्यांचे चार आजही प्रेरणादायी आहेत.

समाजातील दुर्बल, उपेक्षित अशिक्षित घटकाला न्याय मिळावा, त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी शाहू महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. त्यावर त्यांनी यशस्वीरित्या मात केली. त्यांनी कृतीतून आदर्श निर्माण केला. आजही आरक्षणासाठी अनेकांचा लढा सुरू आहे. या आरक्षणाच्या माध्यमातून सर्व समाजाला समान न्याय मिळाला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

नगर जिल्ह्यात लाख ६९ हजार कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली आहेत. त्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती मा, अटल पेन्शन योजना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सामाजिक न्याय दिनाचा कार्यक्रम हा केवळ एक दिवसापुरताच नसावा. दररोज त्याचे प्रतिबिंब दिसणे आवश्यक आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कवडे म्हणाले, हिंदू संस्कृतीत दानाला फार महत्त्व आहे. जगातून जाण्यापूर्वी आपल्या स्वत:कडील जे आहे ते दान करावे. देशात लाख ८२ हजार व्यक्ती अंध आहेत. नेत्रदान करून त्यांच्या जीवनात प्रकाश आणावा. मंजूषा गुंड, प्रा. शेलार यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी भाषणे झाली. अस्मिता मराठे या बालकवयित्रीने मुलगी ही कविता यावेळी सादर केली. गुणवंत द्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रमात करण्यात आला.

द्यार्थ्यांनी काढलेल्या समता दिंडीने लक्ष वेधले
राजर्षीछत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय दिनाच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीत विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विध महापुरुषांची वेशभूषा केलेल्या विद्यार्थांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक प्रबोधनाच्या घोषणा दिंडीत सहभागी झालेली मुले देत होती.

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा मा उतरवणार
जामखेड,कर्जत मतदारसंघांतील सर्व बीपीएलधारकांचा प्रधानमंत्री सुरक्षा मा योजनेंतर्गत मा उतरवण्यात येणार असून, या विम्याची रक्कम आपण स्वत: भरणार आहोत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकारी संस्था आहेत. या संस्थांनीही आपल्या कर्मचांसाठी अटल मा उतरवावा. खासगी कारखान्यांनी कामगारांचा हप्ता भरावा. जिल्ह्यातील आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील नागरिकांचा मा उतरावा.'' रामिशंदे, पालकमंत्री.
बातम्या आणखी आहेत...