आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे भिकारी बनले लखपती; राजकीय नेतेच नव्हे स्टार्सही करतात पूजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील 'शनि शिंगणापूर मंदिर' प्रसिद्ध देवस्थान आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येतात. शनिदेवाला तेल अर्पण करतात तर मंदिराबाहेर बसलेल्या भिकार्‍यांना साखर, तेल, उडीद दान केले जाते. दान मिळालेल्या वस्तू दुकानदारांना विकून येथील भिकारी लखपती बनल्याची महिती एका अहवालात समोर आली आहे. देशातील राजकीय नेतेच नव्हे तर बॉलिवूड स्टार्सही पूजा करतात. शन‍िदेवाला साकडं घालतात.

अहवालानुसार, शनि शिंगणापूर मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येने भाविक देतात. यात विदेशी भाविकांचाही समावेश असतो. शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक तेल अर्पण करतात. त्याचप्रमाणे मंदिराबाहेर बसलेल्या भिकार्‍यांना साखर, तेल, उडिद दाळ दान स्वरुपात दिल्या जातात. मा‍त्र, भिकारी इतर दुकानदारांना त्या वस्तू विकून लखपती बनले आहेत.

देशातील भाविकांशिवाय देशातील राजकीय नेते, बॉलिवूड स्टार्स येथे हजेरी लावतात. कॉंग्रेस नेते शशी थरूर, अभिनेता जितेंद्र आणि त्यांची कन्या एकता कपूर, संजय दत्त, प्रियांका चौप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटीज शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी नेहमी येत असतात.
शनिदेवाला तेल अर्पण केल्याने भाविकांची मनोकामना पूर्ण होते. तसेच भिकार्‍यांना दान केल्याने आपल्यावर शनिचा कोप होत नाही, असे मानले जाते. शनि शिंगणापूर येथे भिक मागण्यासाठी आजुबाजुच्या परिसरातील लोक येतात. नेवासा तालुक्यातील एका महिला भिकारीने भिकमध्ये मिळालेला एक-एक रुपया जमा करून बंगला खरेदी केल्याची माहिती मिळाली आहे. त्यात एसी रुम आणि लक्झरी सुविधा आहेत.
त्रस्त आहे ट्रस्ट आणि भाविक
शनि शिंगणापूर मंदिराचा संपूर्ण कारभार श्री शनिश्वर देवस्थान ट्रस्ट पाहाते. ट्रस्टचे सदस्य जी. के. दरंदले यांनी सांगितले की, येथे भिकार्‍यांचा सूळसुळाट झाला आहे. त्यामुळे ट्रस्टची प्रतिमा मलीन झाली आहे. ट्रस्टच्या तक्रारीवरून पोलिसांनी भिकार्‍यांवर अनेकदा कारवाईही केली. मात्र, त्याचा काही एक उपयोग झाला नाही. त्याचाप्रमाणे मंदिरात देणारे भाविक देखील या भिकार्‍यांमुळे त्रस्त झाले आहेत.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, शनि शिंगणापूर येथील निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...