आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

400 वर्षांची परंपरा तोडली: शनी शिंगणापूर मंदिर ट्रस्‍टमध्‍ये दोन महिलांची नावे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर - श्री क्षेत्र शनी शिंगणापूरच्या इतिहासात बुधवारी क्रांतिकारी घटना घडली. शनिशिंगणापूरच्या विश्वस्तपदी दोन महिलांची निवड झाली आहे. ट्रस्‍टने जाहीर केलेल्‍या विश्वस्तमंडळात यादीत दोन महिलांचे नाव असल्‍याने तब्‍बल 400 वर्षांची परंपरा तोडली गेली आहे.
काही दिवसांपूर्वी श्री क्षेत्र शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर एका महिलेने प्रवेश केला आणि राज्‍यासह देशभरात या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. त्‍यानंतर शनी शिंगणापूरच्या विश्वस्तपदाचा मान मिळवण्‍यासाठी महिलांनी कंबर कसली. 4 ते 5 महिलांनी विश्‍वस्‍तपदासाठी मोर्चेबांधनी सुरू केली होती. त्‍यापैकी दोन महिलांना ट्रस्‍टमध्‍ये जागा मिळाली आहे.
काय आहे महिलांची भूमिका
- शनी शिंगणापूरला महिला सुरक्षारक्षक आहेत. महिला पोलिसही आहेत. मग येथे महिला विश्‍वस्‍त का असू नये.
- मंदिराच्‍या विश्वस्तपदासाठी महिलांनी आरक्षणाची मागणी केली होती.
- शनीदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश नाकारला जात असल्‍याने महिलांनी ही मागणी लावून धरली होती.
चौथर्‍यावर चढून महिलेने घेतले होते दर्शन
अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथील शनी मंदिरातील चौथर्‍यावर चढून एका महिलेने शनी देवाचे दर्शन घेतले होते. गावक-यांनी या घटनेचा संताप केला. ग्रामस्थांच्या विरोधामुळे घटनेवेळी चौथार्‍यावर साफसफाई करणारे तिघे जण तसेच चार सुरक्षा रक्षक अशा एकूण सात जणांना देवस्थानाने निलंबित केले. देवस्थानाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही घटना घडल्‍याचे म्‍हटले जाते.