आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्शन परंपरा मोडणाऱ्यांचे प्रबोधन करणार; महिला विश्वस्तांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे- युवती, महिलांनी शनिदेवाचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला, युवतींचे चौथऱ्यावर जाण्यासाठी प्रबोधन करू, अशी प्रतिक्रिया शनिशिंगणापूर देवस्थानच्या नूतन विश्वस्त शालिनी लांडे यांनी व्यक्त केली.

दुसऱ्या महिला विश्वस्त अनिता शेटे म्हणाल्या, महिलांनी शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेणे हे परंपरेच्या विरोधात आहे. ही परंपरा मोडण्यासाठी येणाऱ्या महिला, युवतींच्या विरोधात प्रतिआंदोलन उभारू, असा इशाराही त्यांनी दिला.

परंपरा मोडून शनिशिंगणापूर येथे युवतीने शनिदेवाचे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर राज्यात मोठ गहजब झाला. समाजाच्या विविध वर्गांतून अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. महिला दर्शनाच्या विरोधात समर्थनार्थ राज्यभर आंदोलने झाली. या देवस्थानच्या विश्वस्त निवडीकडे राज्यासह देशाचे लक्ष लागले होते. परंपरा मोडून प्रथमच शनिशिंगणापूरच्या देवस्थानच्या विश्वस्तपदी दोन महिलांची निवड करण्यात आली. या निवडीचे राज्यभरातून स्वागत करण्यात आले.

दरम्यान, भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या ४०० महिला २६ जानेवारीला परंपरा मोडून शनिदेवाला तेल वाहतील आणि पूजा करतील, असे तृप्ती देसाई यांनी बुधवारी सांगितले होते. आता या महिला विश्वस्तांनी परंपरा मोडणाऱ्यांचे प्रबोधन करू, प्रसंगी प्रतिआंदोलनही करू, असे म्हटल्याने संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत.

शालिनी लांडे म्हणाल्या,महिलांसाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था करणार आहे. महिला सुरक्षा रक्षकांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात येईल. भक्तांना कमिशन एजंटांचा त्रास होतो. तो कमी होण्यासाठी अशा एजंटांवर कारवाई करू.

अनिता शेटे म्हणाल्या,चौथऱ्यावर जाऊन महिलांनी दर्शन घेणे हे परंपरेविरुद्ध आहे. ही परंपरा मोडण्यासाठी येणाऱ्या महिला, युवती यांच्या विरोधात प्रति आंदोलन उभारू. विश्वस्तपदाचा अर्ज भरण्यासाठी कोणाचाही दबाव नव्हता.

शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाऊन दर्शन घ्यावे, या मताच्या महिला विश्वस्त असतील, अशी अपेक्षा महिला भक्तांना होती. याबाबत नूतन महिला विश्वस्तांशी संवाद साधला असता त्या परंपरा मोडण्यास तयार नसल्याचे जाणवले...