आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shankar Thanekar Murder Case,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शंकर ठाणेकर खूनप्रकरण- आरोपींच्या शोधासाठी पाच पथके रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेड- नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख शंकर ठाणेकर यांच्या खूनप्रकरणी आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत. या गुन्ह्याशी साधर्म्य असणा-या संशयितांची चौकशी सुरू आहे. मात्र, तपासात कुठलीही प्रगती नसल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

नगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवरील मोहा शिवारात मंग‌ळवारी (२ सप्टेंबर) मध्यरात्री एकच्या सुमारास लूटमार करून ठाणेकर यांचा खून करण्यात आला. या तपासात विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण साळुंके, पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी स्वतः लक्ष घातले आहे. नगर, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद व बीड या पाच जिल्ह्यांत पोलिसांची पाच पथके पाठवण्यात आली आहेत. त्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणची ३, तर कर्जत उपविभाग व जामखेड पोलिसांचे प्रत्येकी एक पथक आहे. आधुनिक साधनांचा वापर करून शोधमोहीम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून देण्यात आली. दुपारी नगरला जेवण करून निघालेले ठाणेकर व त्यांचे सहकारी जामखेडमध्ये कोठे थांबले होते, ते कोणाला भेटले, जामखेडहून निघताना त्यांना इतका उशीर म्हणजे मध्यरात्र कशी झाली याविषयीही सध्या जामखेड व परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.