हरिद्वार / शिर्डी - द्वारका तसेच ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी शिर्डीच्या साईबाबांची हिंदूंनी पूजा करणेच योग्य नसल्याचे सांगत नवा वाद पेटवला आहे. साईबाबा देव नव्हतेच, असे सांगताना श्री साई हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असल्याचा दावाही खोटा असल्याचे शंकराचार्यांनी म्हटले आहे. शिर्डीत कुणी मुस्लिम पूजाच करत नाही. मग आपण तरी सार्इंची पूजा कशाला करायची, असा प्रश्न उपस्थित करून भारतातील हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी हे रचलेले षड्यंत्र होते, असा दावा शंकराचार्यांनी केला.
हरिद्वारमध्ये रविवारी माध्यमांशी बोलताना हिंदू धर्मातील काही तत्त्वेही त्यांनी नमूद केली. त्यांच्या मते, हिंदू धर्मात अवतारपुरुष, गुरूंचीच पूजा होते. आजवरच्या 24 अवतारांत कलियुगात फक्त गौतम बुद्ध व कल्की हेच अवतार. या स्थितीत साईबाबांच्या पूजेत अर्थ नाही. सार्इंना अवतारी पुरुषच नव्हे तर गुरूही मानले जाऊ शकत नाही. गुरू आदर्श असायला हवा. सार्इंमध्ये असे काय होते? मांसाहार करणार्यांना आपण गुरू मानूच शकत नाहीत, असेही शंकराचार्यांनी नमूद केले.
शिर्डीतील ऐक्याचे प्रतीक हिरवी-केसरी संदल : साई मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा उत्सव म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. या उत्सवात मुस्लिमांच्या हातात हिरव्या रंगाची पताका तर हिंदूच्या हातात केसरी रंगाची पताका असते. तिला संदल असे संबोधतात. ही हिरवी-केसरी संदल व्दारकामाई मंदिरात लावण्यात येते.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोणत्या गोष्टींमुळे शंकराचार्यांना हे षड्यंत्र वाटते.
छायाचित्र - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्याच्याशी चर्चा करतानाचे शंकराचार्यांचा जुने छायाचित्र.