आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar And Uddhav Thackeray News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

शरद पवार, उद्धव ठाकरे आज निवडणूक प्रचारासाठी येणार जिल्ह्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शुक्रवारी (11 एप्रिल) शहरातील दिल्लीगेट परिसरातील पटांगणात सायंकाळी सहा वाजता प्रचारसभा होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक हे जामखेड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
शिर्डी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले हे र्शीरामपूरला येत आहेत. संगमनेर रस्त्यावरील शुभम मंगल कार्यालयाशेजारी ही सभा होणार आहे.