आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress, Narendra Modi, Nagar

महाराष्ट्राबद्दल द्वेष, ते पीएम कसे होणार? ,केंद्रीय कृषिमंत्री पवार यांची मोदींवर टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - दुष्काळामध्ये महाराष्ट्रातील जनावरांच्या छावण्यांना पशुखाद्य पुरवलेल्या कंपन्यांविरुद्ध कारवाई केली नाही म्हणून गुजरातेतील सहायक निबंधकाला मोदींनी नोटीस बजावली. अन्य राज्यांबद्दल अशी द्वेषभावना असलेली व्यक्ती पंतप्रधान होऊ शकत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली.


पाथर्डी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री मधुकर पिचड, आमदार शंकरराव गडाख, बबनराव पाचपुते, चंद्रशेखर घुले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.


पवार म्हणाले, माझे जुने सहकारी बबनराव ढाकणे यांचे चिरंजीव प्रताप अन्य पक्षात होते. त्यामुळे मला अस्वस्थ वाटायचे. त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने आता आनंद झाला. त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक मिळेल. मोदींवर टीका करताना ते म्हणाले, पवनार आर्शमात जाऊन महात्मा गांधी यांनी चले जावची घोषणा दिल्याचे मोदी म्हणाले होते. परंतु प्रत्यक्षात महात्मा गांधींनी चले जावची घोषणा ऑगस्ट क्रांती मैदानावर दिली होती. ज्याला देशाचा इतिहास माहीत नाही, तो देशाचा इतिहास काय घडवणार आहे? येत्या दीड महिन्यात देशात सर्वत्र अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळणार आहे. गेल्या तीस वर्षांत ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न आपण सोडवले. राजीव राजळेसारखा अभ्यासू उमेदवार लाभला. त्यांच्या रूपाने पुन्हा लोकसभेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी पाथर्डीला मिळणार आहे.