आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sharad Pawar News In Marathi, Nationalist Congress Party, Nagar, Divya Marathi

शरद पवारांचा नगर दौरा रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राजकीय मेळावे रद्द करून सोमवारी बीड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. नंतर ते पुण्याला गेल्याने नगरचा दौरा रद्द झाला. बीड, परभणी येथील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पवार नगरला येणार होते. येथे त्यांचा मुक्काम होता. या भेटीत ते काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार होते. पण ऐनवेळी दौरा रद्द झाल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार म्हणाले, शरद पवार बीडमध्ये पाहणीत व्यग्र असल्याने शेवगाव व कर्जत तालुक्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली. शरद पवार बीडहून थेट पुण्याला गेले. दरम्यान, शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री मधुकर पिचड यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांच्या विश्रामगृहातील बैठकीत ते बोलत होते.