आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार यांच्याकडून जगताप कुटुंबाचे सांत्वन, कुंडलिकराव यांच्‍या निधनाने सहकार क्षेत्राची हानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीगोंदे- कुकडी सहकारी साखर कारखान्याचे स्वप्न पूर्ण करणारे कुंडलिकराव जगताप यांच्या निधनाने श्रीगोंद्याच्या राजकारणात भरून निघणारी पोकळी निर्माण झाल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सांगितले. 
 
जगताप यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार झाले. पवार यांनी सायंकाळी पिंपळगाव पिसा येथे आमदार राहुल जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन जगताप परिवाराचे सांत्वन केले. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे, आमदार संग्राम जगताप, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, दत्तात्रय पानसरे, अण्णासाहेब शेलार उपस्थित होते. वळसे म्हणाले, कुंडलिकराव हे राजकारणात वचक असणारे दिग्गज नेते होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...