राळेगणसिद्धी - केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सहकारी पक्ष काँग्रेसच्या दिल्लीतील 28 जागा आम्ही आम आदमी पार्टीच्या (आप) झोळीत घेतल्या आहेत. लोकसभेच्या वेळी बारामतीची जागाही झोळीत घेऊ, असे आव्हान ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे सहकारी डॉ. कुमार विश्वास यांनी दिले. दिल्लीत पुन्हा निवडणुका झाल्यास निश्चित सत्तेवर येऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गोपाल राय यांच्यासोबत गुरुवारी राळेगणसिद्धीत आलेल्या डॉ. विश्वास यांनी अण्णांशी बंद खोलीत चर्चा केली. अण्णांनी त्यांना राजकीय भाष्य करू नका, असा सल्ला दिल्याचे समजते. दरम्यान, पवार यांनी ‘आप हा झोळीवाल्यांचा पक्ष’ असल्याची संभावना केली होती. त्यावर विश्वास यांनी प्रत्युत्तर दिले. विश्वास म्हणाले, गेल्या 5 एप्रिलला मंत्र्यांच्या बैठकीत जो मसुदा ठेवला, तोच मंजूर झाला पाहिजे. तसे न झाल्यास आम्ही राजकीय आंदोलन उभारू. सोमवारी जनलोकपाल विधेयक राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. ते पाहून निर्णय घेऊ.
अण्णा-केजरीवाल वाद सात्त्विक... वाचा पुढे...