आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांचा जीवनप्रवाह आशावादी होता, अभिनेते शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जगाच्या इतिहासात अद्वितीय ठरलेला भारत देश आज आंतरबाह्य पोखरला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामाेदर सावरकर यांचा जीवनप्रवाह हा अत्यंत खडतर, क्लेशकारक, आशावादी, अद्वितीय कर्तृत्वाचे दर्शन घडवणारा होता, असे मत वक्ते अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
धनसंपदा पतसंस्था आयोजित, संपदा प्रतिष्ठान संचलित सहाव्या ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत "सावरकर-एक जीवनप्रवाह' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बजाज होते. यावेळी अरविंद पारगावकर, अशोक भगत, विश्वस्त मिलिंद गंधे, अशोक सोनवणे, अरुण कुलकर्णी, कारभारी भिंगारे, विनोद बजाज, साहेबराव नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पोंक्षे म्हणाले, देशाच्या आजच्या या दुर्दैवी अवस्थेला स्वातंत्र्यवीर सावरकर या विभुतींची किंमत आम्ही भारतीय ओळखू शकलेलो नाही. हे एकमेव कारण आहे, माणूस म्हणून जगण्याचा इतरांप्रमाणे आम्हालाही हक्क आहे. तो हिरावून घेण्याचा अधिकार ब्रिटीशांना कोणी दिला, या प्रश्नाभोवती स्वातंत्र्यलढ्याची सूत्रे गुंफलेली आहेत. सावरकरांनी जातीय विषमतेवर धर्मांतर हा उपाय नाही, हे सांगितले होते. चित्पावन कुटुंबात जन्मलेल्या या व्यक्तीने सवर्ण दलित यांच्यातील विषमता दूर करण्यासाठी माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी लढा पुकारला. सावरकरांचा विचारच विषमता दूर करण्यासाठी योग्य उपाय आहे, असेही पोंक्षे यावेळी म्हणाले.
सावकर द्रष्टे नेते होते
जगाचाइतिहास बघितला, तर अहिंसेने कोणतीच प्रश्ने सुटलेली नाहीत. प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, यांनी रामायण-महाभारत केलेच नसते. माणसाचा जन्मच युद्धातून झाला आहे, हे शास्त्रीय कारणासह पटवून देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर हे द्रष्टे नेते होते. या नेत्याने जगाच्या नकाशावर भारताच्या सीमा निश्चित करा, असे ठणकावून सांगितले, असेही पोंक्षे म्हणाले.