आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार कर्डिलेंनी पाच वर्षांत कमावले 16 कोटी, जेऊर येथे प्रा. शशिकांत गाडे यांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळकी - आमदार शिवाजी कर्डिलेंनी भ्रष्टाचाराने आणि सर्वसामान्य जनतेला लुटून पाच वर्षात १६ कोटी रुपयेे कमावले. जेऊर जिल्हा परिषद गट हा आमदार शिवाजी कर्डिलेंचा बालेकिल्ला मानला जातो. याच आमदार कर्डिलेंच्या बालेकिल्ल्यातून प्रचाराची सुरुवात करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी आमदार कर्डिलेंविरोधात एल्गार पुकारला. 

शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार भाग्यश्री मोकाटे पंचायत समिती उमेदवार मंगल आव्हाड आणि बुऱ्हाणनगर पंचायत समिती गणातील उमेदवार शोभा आल्हाट यांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. प्रचारसभेत प्रा. गाडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार कर्डिले समर्थक जेऊरचे माजी सरपंच दिलीप बनकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे, उपजिल्हाप्रमुख भीमराज आव्हाड, दत्ता तापकिरे, गोविंद मोकाटे, आदी उपस्थित होते.
 
जेऊर जिल्हा परिषद गट हा आमदार कर्डिलेंचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यातील जेऊर पंचायत समिती गणातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे निवडून येऊन आमदार कर्डिलेंना धक्का दिला होता. त्याच गोविंद मोकाटे यांची कन्या आता शिवसेनेकडून उमेदवारी करत आहे. जेऊर जिल्हा परिषद गटातील मतदार हा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत वेगळा आणि विधानसभा निवडणुकीत वेगळा रंग दाखवतो हा इतिहास आहे. याच गटातून शिवसेनेने प्रचाराचा प्रारंभ केला. 

म्हस्के म्हणाले, मोकाटेंना ऐनवेळी राष्ट्रवादीचा एबी फॉर्म देण्याचे टाळून भाजपला चाल द्यायचा डाव राष्ट्रवादी करत होती. त्याचा सुगावा लागल्याने आम्हीच त्यांना शिवसेनेत जाण्याचा सल्ला दिला. 

तेव्हा दोन कोटी, तर आता सोळा कोटी कसे 
आमदार शिवाजी कर्डिले यांनी २००९ च्या विधानसभेच्या वेळी संपत्ती कोटी फॉर्मवर जाहीर केली. २०१४ च्या विधानसभेवेळी ती १६ कोटी दाखवण्यात आली. या संपत्ती वाढीचे रहस्य कर्डिलेंनी जाहीर केले पाहिजे. जनता आणि आम्हीही क्लासला येऊ, असा टाेलाही त्यांनी लावला. पवनचक्क्यांसाठी लोकांच्या जमिनी कवडीमोल भावात घेत १० ते १२ लाखांना कंपनीला दिल्या. पवनचक्क्यांकडून हप्ते वसुली केली जातो. अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने केलेली कामे आमदार निधीच्या खर्चात दाखवली. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ही संपत्ती आमदार कर्डिलेंनी मिळवली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनी केली. 
बातम्या आणखी आहेत...