आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगावात भारतीय जनता पक्षाला खिंडार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीदरम्यान तालुक्यात फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, ‘केदारेश्वरचे’ संचालक काशिनाथ चेमटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपाला खिंडार पडले आहे. केदारेश्वरचे माजी संचालक राजेंद्र दौंड, बाळासाहेब फुंदे, एकनाथ पोकळे, किसन राठोड, तसेच माजी तालुका उपाध्यक्ष संजय टाकळकर यांनी आमदार चंद्रशेखर घुलेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपाला आणखी एक धक्का दिला.
लहुजी सेनेचे नितीन मिसाळ यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपामध्ये नेतृत्व विश्वासात घेत नव्हते त्यामुळे भाजपाचा त्याग करून आमदार घुलेंच्या विकासाची तडक, जाती पाती धर्मविरहीत राजकारण, समाजकारण करण्याची पद्धत सुस्पष्ट स्वभाव यामुळे आम्ही भाजपात प्रवेश केल्याचे राजेंद्र दौंड म्हणाले. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर चंद्रशेखर घुलेंनी भाजपाच्या कार्यकर्त्यांना फोडून राष्ट्रवादीत प्रवेश देऊन धक्का देतानाच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीने बोधेगावचे जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे यांना भाजपात प्रवेश देत राष्ट्रवादीच्या सुरुंग लावला तालुक्यात दोन्ही पक्षांकडून सुरू झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत अटीतटीच्या चुरशीच्या त्याचबरोबर बहुरंगी आहे.