आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव शहरातील वाहतुकीचा बोजवारा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - शेवगाव शहरातील मुख्य रस्ते व शहरातून जाणारे महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने शहरात वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
शेवगाव शहरापासून श्रीक्षेत्र पैठण, मोहटादेवी देवस्थान जवळ असल्यामुळे दररोज शहरातून मोठ्या प्रमाणात भाविक या तीर्थक्षेत्राला भेटी देण्यासाठी शेवगावात येत असतात. मात्र, शहरातील एस.टी. बसस्थानक चौक, डॉ.आंबेडकर चौक, मोची गल्ली, नगर रोड, मिरी रोड, नेवासा रोड, पाथर्डी रस्ता व पैठण रोड या भागात वाढत्या अतिक्रमणांमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यातच बेशिस्त वाहनाचालकांमुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीनच भर पडते. या रस्त्यावरून वाहनचालकांना वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. वाहतुकीच्या कोंडीमुळे शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. वाहतुकीच्या नियत्रंणासाठी वाहतूक शाखेचे पाच वाहतूक पोलिस नियंत्रकांची गरज असताना केवळ दोन पोलिसांनाच हे काम करावे लागते. त्यातच शहरातून चार साखर कारखान्यांच्या उसाची वाहतूकही होते. वाहतुकीची कोंडी झाल्यास या वाहनांना शहरातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रशासन अतिक्रमणधारकांना नोटिसा पाठवते. मात्र, पुढे कुठलीच कारवाई होत नाही. प्रमुख रस्त्यावर पक्की अतिक्रमणे झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करते.