आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेवगाव बलात्कार प्रकरण: पोलिस अधीक्षकांविरुद्ध फिर्याद दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शेवगाव प्रथमवर्ग न्यायालयाने अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्कार प्रकरणी फौजदारी दंड संहिता कलम 156 (3) प्रमाणे दिलेल्या आदेशानुसार शेवगाव पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांनी कारवाई केली नाही. याबाबत तक्रार करूनही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी कारवाई न केल्याने त्यांच्याविरुद्ध येथील प्रथमवर्ग न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

जानेवारी 2011 मध्ये साडेपंधरा वर्षांच्या मुलीला पळवून नेऊन बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी शेवगाव ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी संजय बाबासाहेब ढाकणे याला अटक केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिला बालसुधारगृहात पाठवणे आवश्यक होते. मात्र, तपासी अधिकारी तत्कालीन पोलिस निरीक्षक अशोक आमले, पोलिस कर्मचारी सातपुते व अँड. व्ही. व्ही. जोशी यांनी पुरावा बदलण्याच्या उद्देशाने संगनमत करून पीडित मुलीचा ताबा आरोपीचा चुलता सुखदेव ढाकणे याच्याकडे दिला. तो संबंधित मुलीचा चुलता असल्याचे दर्शवण्यात आले. पीडित मुलीच्या वतीने दाद मागण्यासाठी शेवगाव न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात आली. शेवगाव न्यायालयाने सीआरपीसी 156 (3) नुसार आमले, सातपुते, अँड. जोशी व सुखदेव ढाकणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

निरीक्षक सतीश माने यांनी तपास केला नाही. उलट फिर्यादीवर दबाव टाकून प्रकरण मिटवून घेण्याचा प्रयत्न करत गुन्ह्याचे गांभीर्य कमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.