आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या अटकेसाठी शेवगाव बंद; गावातील दोघांना पाच जणांनी लुटल्यानंतरचे पडसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव - शेवगाव शहरात दोन गटांतील तरुणांत झालेल्या मारहाणीच्या कारणावरून मारहाण करून दहशत पसरवणार्‍या आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी माळीवाडा मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी शेवगाव बंद पुकारण्यात आला होता. दुपारी बारा वाजेपर्यंत बाजारपेठेतील व्यवहार बंद ठेवून व्यापार्‍यांनी प्रतिसाद दिला. चोवीस तासांत आरोपींना अटक न केल्यास शनिवारी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला.

शेवगाव येथील माळीवाड्यात बुधवारी रात्री देविदास लिंगे व लक्ष्मण घुगे या दोन तरुणांना एका गटातील नितीन सुपारे व अन्य पाच तरुणांनी जनता व्यासपीठाजवळ मारहाण करून 5 हजार 500 रुपये व गळयातील मौल्यवान वस्तू क ाढून घेतल्या. यातील देविदास लिंगे यास गंभीर दुखापत झाल्याने नगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेच्या निषेधार्थ माळीवाडा मित्र मंडळाच्या वतीने सचिन आधाट, संतोष घुगे, गणेश लिंगे, साईनाथ आधाट, संतोष शिंदे, संजय नांगरे यांनी शेवगाव बंदची हाक दिली होती. या बंद आंदोलनास समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते, तरुणांनी मोठय़ा संख्येने सहभागी होते.

आजपर्यंत गावात क ोणत्याही प्रकारची भांडणे झाली की गाव पुढारी पोलिस ठाण्यात येऊन आपापसांत तडजोड करून मामला थंड करीत असल्याने पोलिस ठाण्याला तडजोड केंद्राचे स्वरूप आले आहे. त्यामुळे शहरात कोणालाही पोलिसांची भीतीच वाटत नाही. शहरात सध्या मोठय़ा प्रमाणात लुटमार, चोर्‍यांचे वाढ झाली. याला राजकीय पुढारीच जबाबदार आहेत, अशी प्रतिक्रिया वृत्तपत्र विक्रेते संजय धनवडे यांनी व्यक्त केली.

आरोपींचा बंदोबस्त करा
आरोपी हे गावातील सर्वसामान्यांना नेहमीच त्रास देतात. त्यांच्या विरोधात पूर्वीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, तसेच वाढत्या गुन्हेगारीस आळा बसवावा.’’
संजय नांगरे, ग्रामपंचायत सदस्य, शेवगाव.

जनतेने सहकार्य करावे
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फिर्याद दाखल होण्यापूर्वीच आरोपीस अटक केली. फरार आरोपींचा पोलिस शोध घेत असून लवकरच अटक केली जाईल. कायदा व सुव्यवस्था शांतता राखण्यासाठी जनतेने सहकार्य करावे.’’
बजरंग चौगुले, सहायक पोलिस निरीक्षक.