आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारभाराचा निषेध: बँकेच्या अहवालावर ‘गुरुकुल’ने खाल्ले वडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सभासदांच्या हिताची एकही गोष्ट नसलेला शिक्षक बँकेचा अहवाल रद्दीत जमा करण्याच्या लायकीचा आहे, असे सांगत गुरुकुल मंडळाने या अहवालावर वडे खाऊन कारभाराचा निषेध केला.

गुरुकुलच्या पत्रकात म्हटले आहे की, शिक्षकांमध्ये बदनाम झालेल्या काही व्यक्तींचे फोटो अहवालात प्रेरणास्थान म्हणून छापण्यात आले आहेत. या व्यक्तींकडून नेमकी कोणती प्रेरणा घ्यावी, हे मात्र अहवालात नमूद केले नाही. अहवाल म्हणजे छायाचित्रांचा अल्बम आहे. उत्पन्न व खर्चात साडेदहा कोटींची तफावत असून या प्रकारात मोठा आर्थिक घोटाळा लपलेला आहे. बोनससाठी पन्नास लाखांवर तरतूद करणार्‍या संचालकांनी सभासदांना शून्य टक्के लाभांश दिला.

मागील वार्षिक सभेचा दाखवलेला खर्च 5 लाख 50 हजार रुपये संशयास्पद आहे. त्यातच संगणक देखभालीचा खर्च 22 लाख रुपये दाखवून बँक खिशात घातल्याचा आरोप करीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्‍यांसह गुरुकुल मंडळाने अहवालावर वडे खाऊन निषेध केला. यावेळी शिक्षक नेते संजय कळमकर, संजय धामणे, अनिल आंधळे, विजय अकोलकर, राजेंद्र ठाणगे, माणिक जगताप, गजानन जाधव, धनाजी पोते, संजय गारुडकर आदी उपस्थित होते.