आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत धनलक्ष्मीपूजन, साई मूर्तीवर 4 कोटींची आभूषणे; लक्ष्मीपूजनाची 95 वर्षांची परंपरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- फकिराचे आयुष्य जगलेल्या साईबाबांची झोळी जगभरातील भक्तांच्या दानातून कुबेराची झोळी बनली आहे. साईबाबांच्या या ऐश्वर्यसंपन्न धनलक्ष्मीचे लक्ष्मीपूजन गुरुवारी संध्याकाळी पारंपरिक पध्दतीने करण्यात आले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने साईबाबांच्या मूर्तीवर जवळपास चार कोटींची आभूषणे घालण्यात आली होती. हिरेजडित रत्नमुकुटाचा यात सामावेश होता. साईबाबा संस्थानचे  मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता-अग्रवाल यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता साईबाबांच्या घराचे लक्ष्मीपूजन संपन्न झाले. पूजेचे पौराहित्य साई संस्थानच्या पूजाऱ्यांनी केले.

दीपावलीत चारही दिवस पहाटे सुगंधी उटणे लावून साईबाबांच्या समाधीस व मूर्तीस मंगलस्नान घालण्यात आले. नैवेद्यात लाडू,चकली,चिवडा,करंजी असा फराळाचा नैवेद्य दाखवण्यात आला. नवीन वस्र परिधान करून साईबाबांना अलंकार चढवण्यात आले.सायंकाळी साडेचार वाजता समाधी चौथऱ्यावर विद्युत रोषनाई केलेला चौरंग, कर्दळीचे खांब बांधून सुशोभित करण्यात आले. चौरंगावर गहू, त्यावर नक्षीदार सुवर्ण कलस,ताम्हण व त्यात पारंपारिक चांदीची नाणी,चांदीच्या कमळात उभी असलेली लक्ष्मीची मूर्ती व साईबाबांची मूर्ती मांडली.

यावेळी साईबाबा संस्थानचे विश्वस्त भाउसाहेब वाकचौरे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्षा योगिता शेळके पाटील, अभय शेळके पाटील, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रमोद गोंदकर,माजी विश्वस्त सचिन तांबे, अशोक खांबेकर, विलास आबा गोंदकर, मंदिर विभागप्रमुख राजेंद्र जगताप, संस्थानचे प्रमुख अधिकारी, शिर्डीतील प्रमुख ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.

लक्ष्मीपूजनाची ९५ वर्षांची परंपरा
साईबाबांच्या समाधी मंदिरातील लक्ष्मीपूजनाला ९५ वर्षांची परंपरा असून १९२२ मध्ये प्रथम साई संस्थानची निर्मिती झाल्यानतंर लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्यात आली.आजतागायत ही परंपरा सुरू आहे. हे साईबाबा समाधी शताब्दी सोहळा वर्ष असून गेल्या ९९ वर्षांत शिर्डीचे हे देवस्थान आज भाविकांच्या संख्यात्मकदृष्ट्या देशात क्रमांक एकचे तर दानात क्रमांक दोनचे देवस्थान आहे.
बातम्या आणखी आहेत...