Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | shirdi politics over development project

विरोधकांची अवस्था नापास शाळातील घंटागाडीसारखी

प्रतिनिधी | Update - Oct 21, 2011, 09:14 AM IST

गाव बंद करणे, मोर्चा काढणे, भीक मांगो आंदोलन करणे आणि आरोप करणे तसेच विकासकामात अडथळे निर्माण करण्यापलीकडे विरोधकांचे कोणतेही काम नाही. एकमेकांवर विश्वास नसलेले लोक निवडणुकीसाठी आघाडी करण्याची भाषा बोलत आहेत.

  • shirdi politics over development project

    शिर्डी - गाव बंद करणे, मोर्चा काढणे, भीक मांगो आंदोलन करणे आणि आरोप करणे तसेच विकासकामात अडथळे निर्माण करण्यापलीकडे विरोधकांचे कोणतेही काम नाही. एकमेकांवर विश्वास नसलेले लोक निवडणुकीसाठी आघाडी करण्याची भाषा बोलत आहेत. विरोधकांची अवस्था नापास शाळेतील घंटागाडीसारखी झाली असल्याची टीका नगराध्यक्ष कैलास बापू कोते यांनी केली.
    नगरपंचायतीच्या निवडणुकीसंदर्भात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते. ते म्हणाले, पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारख्या सक्षम आणि सतत विकासाचा ध्यास घेतलेल्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली शिर्डीत पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबर राज्य सरकार, साईबाबा संस्थान आणि शिर्डी नगरपंचायतीच्या परस्पर सहकार्यातून कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत.
    लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर शेळके, उपनगराध्यक्ष विश्वासराव कोते, राजेंद्र जगताप, राजेंद्र कोते, मनोज लोढा, अ‍ॅड. अनिल शेजवळ, भानुदास गोंदकर, बापूसाहेब कोते यांनी मनोगत व्यक्त केले.

Trending