आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्इंच्या जयघोषाने दुमदुमली शिर्डी, संस्थानतर्फे तीनदिवसीय रामनवमी उत्सवास प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबा संस्थानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रामनवमी उत्सवास सोमवारी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. देशाच्या कानाकोपर्‍यातून पालखी घेऊन आलेल्या साईभक्तांद्वारे होत असलेल्या साईनामाच्या गजराने अवघी शिर्डी नगरी दुमदुमली आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी काकड आरतीनंतर साईबाबांच्या प्रतिमेची व साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक द्वारकामाईपर्यंत काढण्यात आली.
पद्मलता श्रीनिवास, पी. विजयवाडा, मुकेश भारद्वाज, मितेश क्लासेस (भोपाळ), दिनेशचंद्र वाडेगांवकर, टी. विजय या साईभक्तांच्या देणगीतून प्रसादालयात सर्व भक्तांना मोफत भोजन देण्यात आले.
मंगळवारी रामनवमी हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील. सायंकाळी साडेसात वाजता अजित कडकडे यांचा ‘साईभजनसंध्या’ कार्यक्रम होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता साई सत्संग, आसामी नृत्य सादर केले जाणार आहे.
उत्सवात पहिल्या दिवशी
०सकाळी श्रींची विधीवत पाद्यपूजा ०द्वारकामाई मंडळाची रोषणाई पाहण्यास गर्दी ०मराठी आरतीचा खंड सत्यगरायाचे प्रकाशन ०डॉ. संजयकुमार सप्तर्षी यांच्या ओडिसी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन ०निमंत्रित कलाकारांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद ०द्वारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर खुले