आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीकडे निघालेले पिता, पुत्र अपघातात ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - पौर्णिमेनिमित्त सार्इंच्या दर्शनासाठी शिर्डीकडे पायी निघालेले सिन्नर येथील पिता-पुत्र खासगी बसच्या धडकेत जागीच ठार झाले. रविवारी पहाटे मुसळगाव फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. शशिकांत एकनाथ जाधव (वय 51) व त्यांचा मुलगा राहुल (वय 22) अशी मृतांची नावे आहेत.

जाधव नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती मुद्रणालयात नोकरीस होते, तर मुलगा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दर पौर्णिमेस शिर्डीस पायी दर्शनासाठी जाण्याचा जाधव यांचा शिरस्ता होता. रविवारी 16 व्या वारीसाठी त्यांनी मुलास सोबत घेतले. पहाटे 4.45 च्या सुमारास घरातून बाहेर पडले. मुसळगाव फाट्याजवळील इंडिया बुल्स प्रवेशद्वारानजीक पाठीमागून आलेल्या राघवेंद्र कंपनीच्या खासगी प्रवासी बसने त्यांना जोराची धडक दिली. याप्रकरणी बसचालक शंकर पांडुरंग माने (48, रा. खेतवाडी, मुंबई) यास पोलिसांनी अटक केली.