आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शंकराचार्यांच्या सूचनेचा शिर्डीत परिणाम नाही, भाविकांची गर्दी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईबाबा देव नाहीत, त्यांची पूजा करू नका, म्हणणारा एक मतप्रवाह गेल्या काही दिवसांपासून पुढे अाल्याने नवे वादळ निर्माण हाेऊ पाहत अाहे. छत्तीसगडमध्ये कवर्धा येथे
सुरू असलेल्या धर्मसंसदेत विविध पीठांच्या शंकराचार्यांनी साईबाबांना देव मानू नका, असे म्हटले असले तरी साईभक्तांवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. उलट शिर्डीत गर्दी वाढल्याचे दिसत अाहे. बाबांनी ‘सबका मालिक एक’ हा विश्वव्यापक एेक्याचा संदेश दिला. श्रद्धा अाणि सबुरीच्या माध्यमातून क्राेधावर अंकुश अाणि संयमीवृत्ती ठेवण्याचा संदेश मानवजातीच्या कल्याणासाठी दिला.
साई संस्थान अाणि शिर्डी ग्रामस्थांनी माेफत भाेजनालय, सुपरस्पेशालिटी रुग्णालय, भक्तनिवास,शिक्षण संस्था सुरू करून हे कार्य सुरू ठेवले. या कार्याला काेट्यवधी
साईभक्तांनी सढळ हाताने मदत केली अाणि करीत अाहेत. सर्व धर्मांचे लाेक साईंसमाेर नतमस्तक होतात.

शंकराचार्यांनी भूमिका बदलावी
>शिर्डी सर्वधर्मसमभावाचे प्रतीक बनले अाहे. शंकराचार्यांची भूमिका चुकीची असून त्यांनी ती मागे घ्यावी. त्यातच त्यांचे माेठेपण राहील. अन्यथा साईभक्तीवर त्याचा
काहीही परिणाम हाेणार नाही.
-व्ही. राजू यादव, साईभक्त, हैद्राबाद

साईबाबा देवच
> राम, श्रीकृष्ण हेसुद्धा मानवरूपात जन्मलेेले देवच हाेते. साईबाबा हेसुद्धा अशातलाच प्रकार असून शंकराचार्य हे साईंच्या देवत्वाचा अपमान करत अाहेत.
-सत्यनारायण, साईभक्त, भाेपाळ

शेकडाे पालख्या अन् साईभक्तीचा महिमा
शिर्डी येथे श्रीरामनवमी, गुरुपाैर्णिमा, साई पुण्यतिथी हे उत्सव भक्तिभावाने साजरे हाेतात. या तीनही उत्सवांना राज्यातून तसेच बाहेरच्या राज्यातून शेकडाे पालख्या येत असतात. श्रीरामनवमी उत्सवाला एकट्या मुंबईतून २०० पालख्या येतात. यात दाेन लाख भाविक सहभागी झालेले असतात. पालख्यांमध्ये सहभागी हाेऊन चालत येणाऱ्यांमध्ये उच्च शिक्षित तरुण वर्गाचे प्रमाण माेठे असते.