आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत साईबाबांच्या साहित्याचे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभारावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी : साईबाबा समाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने साईभक्तांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच साईबाबांच्या संदर्भातील गेल्या दीडशे वर्षातील साहित्य एकत्रित करून शिर्डीमध्ये अांतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय उभारावे. शिवाय, अांतरराष्ट्रीय पातळीवरील साई साहित्य संमेलनाचे आयोजन करावे, अशी मौलिक सूचना अांतरराष्ट्रीय स्तरावर साईबाबांच्या विचाराचे प्रचार करणारे डॉ.चंद्रभानू सत्पथी यांनी केली आहे.
साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने आयोजित केलेल्या जागतिक साईभक्तांच्या संमेलनात ते बोलत होते. या वेळी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, विश्वस्त मोहन जयकर, बिपीन कोल्हे, प्रताप थोरात,खा.भाऊसाहेब वाकचौरे, प्रांताधिकारी कुंदन सोनवणे, साईभक्त जितेंद्र शेळके यांच्यासह साई मंदिरांचे जगभरातील विश्वस्त या वेळी उपस्थित होते. डॉ. सत्पथी पुढे म्हणाले, साई संस्थानने जगभरातील साई मंदिरांचे प्रतिनिधी व साईभक्तांना विश्वासात घेऊन साईबाबांचा विचार जगभरात पोहाेचविण्यासाठी नियोजन करावे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये संशोधनासाठी साईंचे दुर्मिळ साहित्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे. साईबाबांनी आयुष्यभर गोरगरिबांच्या आरोग्याची काळजी घेतली. त्यांचा हा आरोग्याचा मंत्र जोपासण्यासाठी शिर्डीत अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाची उभारणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

वंशजांचा सन्मान व्हावा : सत्पथी यांनी संस्थेने साईभक्तांसाठी सुरू केलेल्या मोफत भोजन व प्रसाद निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु, साईबाबांचे हयातीत असलेल्या साईभक्तांकडे आणि त्यांच्या वंशजाकडे संस्थानचे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने अशा साईभक्तांचा आणि साईबाबांच्या वंशजांचा यथोचित सन्मान होण्याची गरज आहे. समाधी शताब्दीचे नियोजन किमान ४-५ महिने आधी करून ती जगभरातील साईभक्तांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. पायाभूत सुविधांचा दर्जाही जागतिक स्तराचाच असावा, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

भाविकांसाठी आता ‘टाइम दर्शन’ योजना
साईभक्तांसाठी टाइम दर्शनाची योजनाही जाहीर करण्यात आली. या योजनेनुसार आता भक्तांना ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर विशिष्ट वेळेतच दर्शन मिळेल. त्यामुळे रांगेतील नाहक त्रास कमी होऊन नियोजन करणेही सोपे जाणार आहे. देशविदेशातील भक्तांसाठी ही योजना फायद्याची ठरू शकते.
बातम्या आणखी आहेत...