आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीचे साईबाबा रुग्णालय राज्यात प्रथम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - कमी उत्पन्न गटातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात साईबाबा संस्थान संचलित साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालय हे राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. दुस-या क्रमांकावर मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल आणि तिस-या क्रमांकावर के. ई. एम. रुग्णालय (मुंबई) आहे.
राज्य सरकारने गरीब आणि कमी उत्पन्न गटातील रुग्णांसाठी जीवनदायी योजना राबवण्यासाठी राज्यातील सरकारी दवाखाने व चॅरिटेबल ट्रस्टच्या दवाखान्यांची निवड केली आहे. आता या योजनेचे नाव बदलण्यात आले असून ते ‘राजीव गांधी जीवनदायी योजना’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश मात्र अद्याप निघालेला नाही. साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने सन 2007 ते 2011 या चार वर्षांत 7 हजार 388 नेत्र शस्त्रक्रिया जीवनदायी योजनेतून करून सुमारे 80 कोटींचा लाभ गरीब रुग्णांना मिळवून देत राज्यात अव्वल स्थान पटकावले. मुंबईतील जे जे रुग्णालयामध्ये चार वर्षांत 2 हजार 326 रुग्णांवर, तर केईएममध्ये 1 हजार 390 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात चार वर्षांत बाह्य रुग्णांची संख्या 3 लाख 88 हजार 150 वर पोहोचली.
आंतररुग्णांची संख्या 62 हजार आहे. चार वर्षांत 29 हजार 70 रुग्णांना बिलात 10 कोटी 19 लाख रुपयांची सवलत देणारे हे एकमेव रुग्णालय ठरले आहे.
अखंड सेवाकार्य - साईबाबा संस्थानच्या माध्यमातून विविध आजारांवर नियमितपणे मोफत शिबिरे आयोजित करून गरीब रुग्णांना मदत केली जाते. साथीच्या आजारांबाबत शासकीय आरोग्य यंत्रणेच्या समन्वयाने संस्थानकडून मोठ्या प्रमाणावर अखंड सेवाकार्य केले जाते. - अशोक वाळुंज, जनसंपर्क अधिकारी.