आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुपौर्णिमा उत्सवकाळात साईचरणी चार दिवसांत 4.93 कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- गुरुपौर्णिमा उत्सवकाळात शिर्डीत गुरुचरणी साईभक्तांनी दानपेटीसह वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या दानाचा उच्चांक गाठला गेला आहे. चार दिवसांत विविध मार्गांनी दानपेट्यांसह संस्थानच्या तिजोरीत 4 कोटी 93 लाख 37 हजार 460 रुपयांचा ऐवज जमा झाला आहे. त्यात विदेशी चलनाचादेखील समावेश आहे. संस्थानतर्फे मोजणी झाल्यानंतर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली.

शिर्डीत या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान चार दिवसांमध्ये सुमारे साडेतीन लाख साईभक्तांनी हजेरी लावली होती.
संस्थानच्या इतिहासात या उत्सवकाळात दक्षिणा जमा होण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी कधीही इतकी मोठी दक्षिणा, सोन्या-चांदीचे दागिने व मौल्यवान वस्तू संस्थानकडे जमा झाल्या नव्हत्या. या दानातून संस्थानतर्फे साईभक्तांसाठी विविध उपक्रम राबविले जातील. त्याचप्रमाणे कायमस्वरूपी धर्मशाळा, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

तिजोरीतील जमा
2 कोटी 67 लाख 94 हजार 893 विदेशी भाविकांनी केलेल्या दानात 22 देशांमधील चलनासह (2,71,19,021)

देणगी :
71 लाख 15 हजार 899
कक्षांमधील रोख रक्कम (68,94,146)
अन्नदान :
25 लाख 63 हजार 102
प्रसादालयातील नोंदणी (23,52,000)
पेट्यांमधील रोख
1 कोटी 2 लाख 20 हजार 618
(गतवर्षी 63,65,515)