आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shirdi Saibaba Temple News In Marathi, Maharashtra

शंकराचार्यांच्या वादग्रस्त विधानानंतरही शिर्डीत साईभक्तांचा ओघ वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईबाबादेव नाहीत, या शंकराचार्यांच्या वक्तव्यानंतरही गेल्या चार महिन्यांत शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. साईंच्या दानपेटीतील दानाची रक्कमही त्याच प्रमाणात वाढली.

शंकराचार्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही, असा निर्णय ग्रामसभेत झाला. त्यानंतर गुढीपाडवा गुरुपौर्णिमा उत्सवांना लाखो भक्तांनी गर्दीचा उच्चांक मोडीत हजेरी लावली. दरवर्षी तिजोरीत जमा होणारी देणगी या वर्षीच्या उत्सवामध्ये ३० पटींनी वाढली. साईबाबा संस्थान या रकमेचा विनियोग रुग्णालय, शिक्षण, रुग्णांना मदत, भक्तनिवास अादी कामांसाठी करते.

साईंच्या झोळीत दान
1200 कोटींच्या ठेवी विविध बँकांत
3,647 किलो चांदी
305 किलो सोने

संस्थानकडे दानातून आलेला ऐवज...
40.25 कोटी एप्रिल ते ऑगस्ट 2013
43.84 कोटी एप्रिल ते ऑगस्ट 2014