आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबा शताब्दी वर्षात मोफत भोजन प्रसाद इच्छूकांना देणगीसाठी अावाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- श्रीसाईबाबा यांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण हाेत असल्यामुळे साई संस्थानमार्फत एक ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ हे वर्ष साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या कालावधीत देश- विदेशातून शिर्डीत येणाऱ्या भक्तांना माेफत प्रसाद भोजन देण्याचा निर्णय संस्थानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात अाला अाहे. दानशूर साईभक्तांनी या याेजनेत सहभागी हाेऊन याेगदान द्यावे, असे आवाहन संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले अाहे.

या याेजनेबाबत शिंदे म्हणाले की, भाविकांना प्रसाद भोजनाचा सुलभतेने लाभ घेता यावा, यासाठी संस्थानने एकर जागेमध्ये भव्य प्रसादालय उभारले आहे. सन २०१८ ला साईबाबांच्या समाधीला शंभर वर्ष पूर्ण होत अाहेत. शताब्दी महोत्सव काळात साईभक्तांना विविध सुविधा पुरविण्याबरोबरच प्रसाद संपूर्ण वर्षभर मोफत देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. साईभक्तांनी आपले आप्तेष्टांचे वाढदिवस किंवा पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ भोजनासाठी देणगी दिल्यास साईबाबांना नैवेद्य अर्पण करुन भक्तांना मोफत प्रसाद दिला जाईल. उत्सव काळात लाख रुपये, वर्षातील इतर दिवसांसाठी लाख रुपये साईभक्तांच्या इच्छेने ५० हजार रुपयांपासून पुढील रक्कम तसेच एकत्रितपणे देणगी भाेजन याेजनेसाठी स्वीकारली जाईल.

अाॅनलाइन नाेंदणी
प्रसाद याेजनेसाठी देणगी देणाऱ्या साईभक्तांची नावे मंदिर प्रसादालयासमोर प्रसिद्ध करण्यात येतील. सविस्तर माहितीसाठी प्रसादालय कार्यालय, देणगी कार्यालय, जनसंपर्क कार्यालय आयटी विभागाशी किंवा (०२४२३) २५८८४४, २५८७३३, २५८७७८, २५८९५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच संस्थानच्या संकेतस्थळावरही ऑनलाईन देणगी स्वीकारली जाईल, असे शिंदेंनी यांनी नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...