आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव पोलिस बंदोबस्ताला शिर्डी संस्थानचा विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - पेशावर आणि पॅरिसमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून गृहविभागाने शिर्डीतील साई मंदिर परिसरात अतिरिक्त पोलिस तैनात केले आहेत. मात्र, आपल्या परवानगीशिवाय पोलिस तैनात केलेच कसे? असा साई संस्थानने आक्षेप घेतला आहे, तर भाविकांच्या सुरक्षेसाठीच बंदोबस्त वाढवला असल्याचे सांगत पोलिस प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार साई मंदिरात १ जानेवारी २०१४ पासून दोन शिफ्टमध्ये दहा पोलिस व चार सशस्र पोलिस तैनात करण्यात आले आहे. या निर्णयावर संस्थान प्रशासनाने आक्षेप घेतला आहे. मंदिरातून तत्काळ पोलिस बाहेर काढण्याचा पवित्रा घेत संस्थानने आपल्या सुरक्षा विभागाला तसे बजावले आहे. साईबाबा मंदिर संस्थान अखत्यारीत असल्याने पोलिस बंदोबस्त वाढण्यापूर्वी संस्थानला विश्वासात घ्यायला हवे होते. पोलिस प्रशासनाचा या बाबतचा प्रस्ताव त्रिस्तरीय मंडळासमोर ठेवून नंतर त्यावर निर्णय झाल्यावर पोलिसांनी मंदिरात सुरक्षेसाठी पोलिस तैनात करायला हवे होते, असे संस्थानचे म्हणणे आहे. त्याचबरोबर संस्थानने पोलिसांना बाहेर काढण्याच्या सूचना केल्या, मात्र तोंडी आदेशाने आम्ही बाहेर जाणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.

व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम
साईबाबा मंदिर हे संस्थानच्या अखत्यारीत येते. मंदिरात पोलिस नेमताना साई संस्थानला विश्वासात घ्यायला हवे होते. पोलिसांनी केवळ पत्र दिले, त्या पत्रावर निर्णय होण्यापूर्वीच आणि संस्थानच्या अनुमतीशिवाय मंदिरात पोलिस नियुक्त करण्यात केले. व्यवस्थापनाच्या निर्णयानंतरच काय ते होईल. राजेंद्र जाधव, कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी