आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई समाधी दर्शन पूर्वीप्रमाणेच ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - व्हीआयपी दर्शनासाठी साईबाबा संस्थानने जनसंपर्क कार्यालय चोवीस तास खुले ठेवावे. तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी पू र्वीप्रमाणेच दर्शन व्यवस्था सुरू करावी अशी मागणी भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानच्या त्रिस्तरीय समितीने मंदीर परिसरातील जनसंपर्क कार्यालय हलवून ते बाहेर नेल्याने आमदार, खासदार, मंत्री आणि देणगीदार यांना दर्शनपास काढण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागते ते योग्य नाही. तसेच देणगीदार आणि अतिमहत्वाच्या लोकांसाठी पेडपास करणे अत्यंत चुकीचे आहे. जनसंप र्क कार्यालय सकाळी वाजता उघडले जात असल्याने काकड आरतीसाठी
लोकांना मुकावे लागते. त्यासाठी जनसंपर्क कार्यालय २४ तास सुरू ठेवावे. नवीन व्यवस्था सुरू झाल्यापासून अतिमहत्वाच्या व्यक्तींचे येणे कमी झाले आहे. १०० रुपये भरूनही दर्शनासाठी तासभर ताटकळत उभे राहावे लागते. पास घेतांना साईभक्तांना योग्य वागणूक मिळत नाही. या मागणीचा विचार करून जुनीच व्यवस्था सुरू ठेवावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.