आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्याच दिवशी शिर्डीचे विमान भाडे झाले दुप्पट; मुंबईसाठी 2800, तर हैदराबादसाठी 6000 रु.

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- शिर्डी विमानतळाचा रविवारी शुभारंभ झाला. साेमवारपासून  मुंबई व हैैदराबादसाठी विमानसेवा नियमित सुरूही झाली. मात्र, पहिल्याच दिवशी विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने विमानाच्या तिकिटात साेमवारी दुपटीने वाढ करण्यात आली. दरम्यान, दुपारी चार सुमारास मुंबई व हैदराबाद येथून विमानातून आलेल्या प्रवाशांचे ग्रामस्थांनी शाल, पुष्पगुच्छ व पेढे भरवून स्वागत केले. पहिल्या दिवशी शिर्डी- मुंबईचे भाडे १५००, तर शिर्डी ते हैदराबादचे भाडे २३०० रुपये होते. साेमवारी एअर अलायन्स कंपनीने मुंबईसाठी २८००, तर हैदराबादसाठी भाडे ६००० रु. केले.
 
हैदराबादचे उड्डाण रद्द
साेमवारी हैदराबाद विमानाचे टेकअाॅफ ४.३५ वाजता होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तयारीही केली हाेती. मात्र हवामान बदल, अंतर्गत अडचणीमुळे उशीर हाेत हाेता. अखेर संध्याकाळ झाल्याने हे उड्डाणच रद्द करण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...