आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Candidate Anil Rathod Rally At Ahmednagar

ज्यांचे वर्तन चांगले नाही, तेच परिवर्तनाबाबत बोलतात- अनिल राठोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ज्यांचे वर्तन चांगले नाही, तेच परिवर्तनाबाबत बोलतात. स्वत: दोन वेळा महापौर व वडील आमदार असतानाही सारसनगर भागात टँकरने पाणी द्यावे लागते. विकासासाठी पैसा लागतो, फक्त बोलून विकास होत नाही. आतापर्यंत तुमचीच सत्ता होती, तरीदेखील विकास करण्याच्या गप्पा मारता, हा हास्यास्पद प्रकार आहे, अशी टीका शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्यावर केली.
पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीमुळेच शहरातील औद्योगिक वसाहत वाढली नाही. शिवसेनेने उद्योगवाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले. महापालिकेत सत्ता असताना पिंपळगाव माळवी येथील सातशे एकर जागेवर महापालिकेचे नाव लावले. बालिकाश्रम, कोठी व केडगाव देवी रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम केले. उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी अनेक आंदोलने केली. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करू. शिवाय उड्डाणपुलाची लांबी वाढवून सक्कर चौक ते थेट डीएसपी चौकापर्यंत उड्डाणपूल करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

शिवसेना आश्वासन नाही, तर वचन देते, हे नागरिकांना माहिती आहे. बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. अवजड वाहतूक शहरातून जाते. त्यामुळे अपघात होतात. आतापर्यंत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. सत्ता आल्यानंतर बाह्यवळणचा प्रश्न मार्गी लावण्यात येणार आहे. शिवसेनेने सुरुवातीपासूनच महिला संरक्षणाला प्राधान्य दिले आहे. यापुढे महिलांचा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार असल्याचे राठोड यांनी या वेळी सांगितले.