आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना शहरप्रमुख कदमसह चौघांविरुद्ध गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर; रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवून दारुविक्री केल्याप्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह चौघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
माळीवाड्यातील ब्राह्मणगल्लीत कदम यांच्या मालकीचे पांचाली हॉटेल आहे. गुरुवारी पहाटे एक वाजला, तरी हे हॉटेल सुरु होते. त्यामुळे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. हजार ३५२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कोतवाली पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरु असताना त्यांना हॉटेल पांचाली सुरु असल्याचे दिसले. हॉटेलला लॉजिंग रेस्टॉरंटचा परवाना असताना तेथे दारुविक्री सुरु असल्याचे दिसले. पोलिसांनी कारवाई करुन दोन घरगुती वापराच्या गॅसटाक्या, वेगवेगळ्या कंपन्यांची दारु, काचेचे ग्लास, खुर्च्या जप्त केल्या. परवाना नसताना मद्यप्राशन करणारा ग्राहकही पोलिसांनी आरोपी केला आहे. संभाजी कदम, चालक शेखर व्यापारी, वेटर सिद्धु संतराम भागानगरे ग्राहक विकास काशिनाथ शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.